ब्लॉग – Ajit Pawar

ग्रामपंचायत निवडणुकीत अजित दादा पवार गटाने मोठे यश
ग्रामपंचायत निवडणुकीत अजित दादा पवार गटाने मोठे यश मिळवल्याने राज्यातील जास्तीतजास्त महानगर पालिका आणि जिल्हा परिषदा जिंकण्याची शक्यता

ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या  समजल्या जातात. येत्या काळात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी या निवडणुका म्हणजे पूर्वतयारी आहे असे समजले जाते. अशा निवडणुकांमधून  विविध राजकीय पक्षांची ताकद किती आहे हे लक्षात येते. कोणत्या तालुक्यातील, कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाकडे आहेत यावरून पुढच्या निकालाची दिशा ही कळत असते. त्या अनुषंगाने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आलेले आहे.

सध्या राज्यातील अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक आहेत. बऱ्याच दिवसापासून निवडणुका विविध कारणांनी प्रलंबित आहेत परंतु आता भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका लवकरच होतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे.जर या निवडणुका लवकरच झाल्या तर अजित दादा पवार गट जास्तीत जास्त महानगर पालिका आणि जिल्हा परिषदा जिंकू शकतो.

राज्यात 15 पेक्षा अधिक महानगरपालिका आणि पंचवीस  जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचां  उत्साह अधिक वाढल्याने लवकरच या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज दिसून येतो.

आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकून घवघवीत यश मिळवलेले आहे. त्यानंतर अजित पवार गटाने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारून मोठे यश संपादन केले आहे.शिंदे गटाने बाजी मारली आहे.

निवडणूक घ्या… म्हणून सारखे विविध मेळाव्यातून, भाषणातून, पत्रकार परिषदेतून सांगणारे श्री. उद्धव ठाकरे यांची या निवडणुकीत मोठी हार झालेली दिसून येते. त्यांचा पक्ष सर्वात पिछाडीवर गेलेला दिसून येतो.तर शरद पवार गटालाही फार यश मिळाले नाही.त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी ठाकरे गटाला त्यांच्या प्रमाणे टोमणे मारणे सुरू केलेले आहे.

ग्रामीण भागात अजित दादा पवार गटाचे चांगले नेटवर्क आहे.अनेक जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत .त्यांच्या सोबत असलेल्या अनेक आमदारांची  भाजपा पेक्षा ग्रामीण भागातील राजकारणावर पकड आहे.सर्व जण सहकारी संस्थांशी जोडले गेल्याने मतदारांशी नाळ जुळलेली आहे.स्वतः अजित दादा यांचा ग्रामीण भागाशी दांडगा जनसंपर्क असल्याने ते यश खेचून आणू शकतात.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा पवार गट यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने त्यांची आघाडी भविष्यात भक्कमपणे उभी  आहे.त्यामुळे महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जर झाल्या तर अजित दादा पवार गट राज्यात क्रमांक एक वर राहील यात शंका नाही.

दादांच्या ‘त्या’ निर्णयाला 2 महिने पूर्ण
राजकारण म्हटलं कि आरोपांच्या फैऱ्या आल्याच. दादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन आता जवळपास २ महिने झाले. भाजपच्या दडपशाहीला घाबरून अजित आणि इतर मान्यवर मंडळी सत्तेत सामील झाली असा आरोप विरोधकांनी केला. पण यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहिले पाहिजे. पवार साहेब हे अजित दादांचे राजकारणातील गुरु आहेत हे दादांनी कित्येकदा जाहीर सभेत मान्य केलं आहे. पण व्यक्तिपरत्वे देखील काही मतभेद असू शकतात. त्याचबरोबर पवार साहेबांचे काही निर्णय कसे पक्षाला अडचणीत आणतात आणि नेत्यांना बुचकळ्यात पाडतात हे दादांनी एका जाहीर सभेत कथन देखील केले. २०१४ ला पवार साहेबांनी भाजपला न मागता दिलेला पाठिंबा असो वा २०१७ मध्ये सत्तेत जाण्याच्या हालचाली असो, पवार साहेब स्वतःहून सत्तेत सामील होण्याच्या हालचाल भूतकाळात करीत होते.

अजित दादा सत्तेत सामील झाले याला काही विशिष्ठ आणि ठोस कारणे आहेत. जनतेला काही घेणे देणे नसते सत्तेत कोण आहे, किंवा मुख्यमंत्री कोण आहे. जनतेला विकास हवा असतो. कामांची पूर्ती हवी असते. लोकांची काम करायची म्हणजे हातात सत्ता हवी. सत्तेशिवाय लोकांची कामे करण्यात मर्यादा येतात हे जवळपास सर्वच राजकारणी मान्य करतात. निवडणुकांना १.५ वर्षे बाकी असताना हाती घेतलेली रखडलेली कामे करण्यासाठीच म्हणून दादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला.

अडचणींचे रडगाणे गाणे अजित दादांना कधीच जमले नाही. धाडसीपणे निर्णय घेऊन ते राबविण्याचा बाणा अजित दादांनी कायम अंगी राखला. यावेळी देखील तेच झाले.  पवार साहेबांच्या विरोधात जाऊन सत्तेत सामील व्हायला वाघाचं काळीज लागतं. अजित दादांनी ते धाडस दाखवलं.

मुख्यमंत्री दर्जाचा पुढारी असून देखील दादा आजवर मुख्यमंत्री का नाही झाले हा महाराष्ट्राला पडलेला सर्वात मोठा प्रश्न. दादांची कार्यशैली जसं सामान्य जनतेला अचंबित करते, तसचं राजकारणात त्यांची हीच कार्यशैली काही नेत्यांच्या डोळ्यात खुपते. त्यामुळे हीच ती योग्य वेळ समजून दादांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेतेली आणि जनतेला पडलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळू लागलं.

राजकारण हा खेळच असा आहे. इथे कायम संबधित राहावे लागते. समाजकारण अखंडित चालू ठेवण्यासाठी काही कटू निर्णय धाडसी निर्णय घ्यावे लागतात. पण वास्तवात पाहता पवार साहेब गट आणि अजित दादा गट हे दोन्ही गट पक्ष फुटल्याचे मान्य करीत नाही. उलट आमच्यातला एक गट सत्तेत सामील झाला आहे पक्ष फुटला नाही हेच पवार साहेबांकडून अधोरेखित केले जात आहे.

कार्यकर्त्यांचे प्रिय दादा
तसं पाहायला गेलं तर अजित दादा पवार आणि कार्यकर्ते हे समीकरण महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. एखादा कार्यकर्ता दादांशी जोडला गेला तर मग जीव गेला तर बेहत्तर पण दादांसाठी वाटेल ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांची असते. वेळप्रसंगी दंडदेखील ज्येष्ठ या नात्याने कार्यकत्यांशी वडील नात्याने संवाद साधतात, त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांची कामे करतात. बदल्यात दादांना मिळते कार्यकत्यांचे अफाट प्रेम.

नुकतीच पुण्यात जिल्हा आढावा बैठक पार पडली. जिल्हा स्तरावर लोकांचे प्रश्न सोडवले जात आहेत का? ह्याचा दादांनी आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी संवाद घालत असताना लोकांची कामे न केल्यास कानाखाली देईन आणि पद काढून घेईन असे दादा म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यावर अनेकांकडून प्रतिक्रया आल्या. पण तिकडे उपस्थित कार्यकर्त्यांना मात्र दादांच्या या वक्तव्याचे काही वाटले नाही. कारण दादा याआधी देखील कार्यकर्त्यांशी कठोर भाषेत बोलले आहे. कार्यकर्त्यांची कानउघाडणी करण्याचा दादांचा उद्देश काही चुकीचा नसतो. लोकांची काम व्हावी, पक्ष पुढे जावा हेच दादांना वाटते.

झाले असे कि, पुण्यातील २ कार्यकर्त्यांचा पदावरून वाद झाला. हे दादांना कळले. यावेळी दादांनी त्यांना चांगलाच दम दिला. मुळात पदावरून कार्यकर्त्यांनी भांडू नये. ज्याला जी जबाबदारी दिली आहे ती त्याने लीलया पार पाडावी असा दादांचा उद्देश असतो. लोकांची काम वेगानी झाली पाहिजे, प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे, यासाठी दादांची धडपड असते. दादा अहोरात्र काम करून जनतेच्या प्रश्नांना महत्व देतात आणि तिथे कार्यकर्त्यांनी पदावरून भांडणे दादांना काही पटले नाही. म्हणनूच त्यांनी थोडा कठोर पवित्रा घेऊन कार्यकर्त्यांना तंबी दिली. पण असं बोलण्याची दादांची हि पहिली वेळ नाही. जिथे जिथे गरज पडते तिथे तिथे दादा असा कठोर पवित्रा घेतात. अंततः दादांचे चिडणे हे लोकांची विधायक कामे पूर्ण होण्यासाठीची तळमळ असते हे कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक असते.

असे आले दादा ‘राजकारणा’च्या वाटेवर…
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री. अजितदादा पवार यांना राजकीय वारसा लाभला असला तरी, ते त्या माध्यमातून राजकारणात आलेले नाहीत. कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर अजितदादांनी काटेवाडीमध्ये शेती करायला सुरुवात केली. प्रारंभीस त्यांनी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे हे पीक पाहण्यासाठी दुरून शेतकरी येत असत. त्यानंतर दादांनी शेती क्षेत्रात विविध प्रयोग केले. दुधाचा व्यवसाय केला. जनावरांची खरेदी केली. त्यावेळी जनावरांसाठी बाजारातून ते स्वतः कडबा खरेदी करत. याशिवाय कुक्कुटपालन व्यवसाय केला. हे सगळे उद्योग करताना सगळी कामं ते स्वतः करत. दादांनी काटेवाडी ते कन्हेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं. लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची आधीपासूनच राहिली आहे. लोकांनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी घेऊन ते आदरणीय शरद पवार साहेबांकडे जात. तिथे प्रश्न मार्गी लावत असत. अशा पद्धतीनं समाजकारण करता करता अजितदादा राजकारणाच्या वाटेवर येऊन उभे राहिले. आणि अखेर राजकारणात प्रवेश झाला.

१९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आजतागायत जिंकून येत आहेत. १९९१ मध्येच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १९९२ ते १९९३ या कालावधीत जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. त्यानंतर १९९९ ते २००३ यादरम्यान पाटबंधारे व फलोत्पादन, २००३ ते २००४ या काळात पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. मग २००४ ते २०१० पर्यंत जलसंपदा व ऊर्जा ही खाती त्यांनी सांभाळली. नोव्हेंबर २०१० मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना ऊर्जा, वित्त व नियोजन या खात्यांचा कामकाज त्यांनी पाहिला. ही वेगवेगळी खाती सांभाळताना अजितदादांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक सगळी महत्त्वाची पदं भूषवल्यानंतर, त्या पदांना न्याय दिल्यानंतर आता अजितदादा विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जनमानसाच्या सेवेसाठी झटत आहेत. अशा तऱ्हेनं दादांचा हा राजकारणापर्यंतचा प्रवास एक प्रगतशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, चेअरमन, उपमंत्री, मंत्री व उपमुख्यमंत्री असा टप्याटप्यानं झाला आहे. प्रत्येक पदावर उत्तम काम केल्यामुळे पुढची संधी त्यांना मिळत गेली. प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध केली. म्हणूनच वारसा म्हणून दादा राजकारणात आले किंवा त्यांना पदं मिळाली असं अजिबात नाही. उपमुख्यमंत्री असताना दादांनी लावलेला कामांचा धडाका हा त्यांच्यातल्या कार्यशील नेत्याचे दर्शन घडवतो. ते एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहेत हे विरोधक देखील मान्य करतात. एवढ्या कार्यक्षम, समर्थ आणि अनुभवसंपन्न व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले तर, महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य बनेल यात काडीमात्र शंका नाही.

वडिलकीच्या नात्याने अजित दादा
तारीख २ मे २०२३. महाराष्ट्राच्या काळजाचे ठोके चुकवणारा दिवस. यादिवशी शरद पवार साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच काय तर संपूर्ण देशाला आश्चर्याचा जबर धक्का दिला. यावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यासारख्या आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या या निर्णयाला विरोध केला. साहेबांनी अश्या प्रकारे आम्हाला सोडू नये अशी भावनिक साद सर्वांनी घातली. पण या सर्व गदारोळात सर्वात वेगळी भूमिका मांडली ती फक्त अजित दादांनी.

सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया दादांनी ऐकून घेतल्या, आणि माईक त्यांच्याजवळ आला. अजित दादाही साहेबांच्या या निर्णयाला विरोध करतील असे वाटत असतानाच दादांनी साहेबांच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि उपस्थित सर्वांच्या कपाळावर आट्या आल्या. पण खरे पाहता दादांनी घेतलेली भूमिका ही समर्पक होती.

प्रॅक्टिकली विचार करता साहेबांनी घेतलेला निर्णय त्यांचे वय पाहता योग्य आहे त्याला आपण पाठींबा द्यायला हवा असे अजित दादांचे म्हणणे होते. साहेब अध्यक्ष पदावरून पायउतार होत आहेत यावरून ते राजकारण आणि समाजकारण सोडत आहे असा याचा अर्थ होत नाही. साहेब कायम आपल्याला मार्गदर्शन करायला हजर असतील असे दादांनी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा सर्व सभागृह भावनिक झालेला असताना अजित दादा मात्र वडीलकीच्या नात्याने खंबीर भूमिका घेऊन परिस्थिती सांभाळली.

कोणत्याही आनंदाच्या असो किंवा दुःखाच्या प्रसंगात भावनांचा प्रचंड उद्रेक झालेला असतो अशावेळी कोणीतरी वडीलकीच्या नात्याने किंवा एकदम हक्काने खंबीर भूमिका घेऊन परिस्थिती शांत करायची असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा सोडता कार्यकर्त्यांना शांत करू शकतील, दम देऊ शकतील असा दुसरा कोणताही नेता नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याला कार्यकर्ते जुमानतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे दादांना ती भूमिका घ्यावी लागली. यावेळेस पवार साहेबांनी किंवा प्रतिभाकाकींनी सुद्धा त्यांना टोकले नाही हे कोणाच्या लक्षात आले नाही.

घरातील खमका पुरुष हा कधीच डगमगत नाही. कितीही मोठं संकट आलं तरी कुटुंब प्रमुख हा शांत आणि संयमी राहून घरातील इतर सदस्यांना आधार देत असतो. वेळप्रसंगी कठोर शब्दात परिस्थिती सांभाळत असतो. पण दादांच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावून त्यांना व्हिलन केले जात आहे हे अत्यंत बाळबोध आहे.

राजकारणात अचानक काहीच होत नाही. दादांना आणि सुप्रिया ताईंना साहेबांचा हा निर्णय आधीपासूनच माहित होता हे दादांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. पवार साहेबांसारखा राजकारणी कोणताच निर्णय उथळपणे घेणार नाही हे अजित दादा आणि सुप्रिया ताईंना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी साहेबांना विरोध केला नाही. उलट त्यांच्या उतरत्या वयात जर भावी अध्यक्षाला घडवता आले तर ते पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी हिताचे आहे अशी दादांनी भूमिका घेतली. आणि यात चुकीचे काहीच नाही. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या हिताचा विषय येतो तेव्हा दादांसारखा खंबीर माणूसच धावून येतो परिस्थिती हाताळायला. दादा म्हणूनच दादा आहे.

दादा मुख्यमंत्री व्हावे ही तर जनतेची इच्छा..!
किती काहीही झालं तरी शरद पवार आणि अजित पवार समजणे हे विरोधकांना शक्य नाही. गेल्या आठवड्यात दादा २ तास गायब होते तर महाराष्ट्रात काहूर उठला होता. माध्यमांनी दिवसभर ती न्यूज चघळली. नको नको त्या तर्क-वितर्कांना उधाण आले. आता काय होईल या विचाराने जनता आणि सत्ताधारी यांची झोप उडाली होती. पण शेवटी दादांनीच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी सोडून आपण कधीही कुठे जाणार नाहीत हे त्यांनी आपल्या जरबेच्या आवाजात ठणकावून सांगितले.

खरं पाहावे तर अजित दादा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक, नेता आणि माध्यम प्रतिनिधींची आहे. दादांच्या काम करण्याची पद्धत सर्वश्रुत असताना सर्वांची अशी ईच्छा असणे हे गैर नाही. निर्णय घेण्याची आणि काम तडीस नेण्याची अनोखी शैली त्यांच्याकडे आहे. असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा अशी जनतेची इच्छा आहे. खुद्द दादांनी देखील हि इच्छा बोलून दाखवली. मुख्यमंत्री हे पद जितक्या प्रतिष्ठेचे असते तितकेच ते पद जबाबदारीचे देखील असते. अजित पवार हे नावच मुळात मुख्यमंत्री पदाला साजेसं असं आहे. कारण या नावाभोवती महाराष्ट्राच राजकरण कसं फिरत हे सार्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात पाहिलंय. महाराष्ट्राच संपूर्ण एकहाती नेतृत्व नजीकच्या काळात अजितदादा करतील याबद्दल कोणाच्याही मनात किंचितशी शंका नाही.

बारामती आणि अजित पवार हे एक दैवी समीकरण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण बारामतीकरांचा पवार कुटुंबावर आणि विशेष करून अजित दादांवर किती जीव आहे हे आपल्याला निवडणुकीच्या मताधिक्यातून दिसून येतेच. गेले ३ दशके दादा महाराष्ट्र विधानसभेवर सदस्य म्हणून निवडणून येत आहेत. महाराष्ट्रात हे सौभाग्य बोटावर मोजता येईल इतक्या नेत्यांना लाभले आहे. अजितदादा त्यापैकीच एक नाव.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती दिसत असली तरी स्थिर नाही. वरच्या पातळीवर प्रचंड उलथापालथ चालू आहे. त्यात अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होतील असे वारे सध्या महाराष्ट्रात वाहू लागले आहे.

दादांचे जलनियोजन…
औद्योगिकीकरणातूनच राज्याच्या विकासाचा राजमार्ग खुला होऊ शकतो. या परिस्थितीत बळीराजाच्या शेतीचे पाणी, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मुबलक पाणी तसेच औद्योगिकीकरणासाठी व वीज निर्मितीसाठी पाणी या साऱ्याचा विचार करता पुरेसे जलस्रोत आणि समान पाणी पुरवठा याबाबत अचूक नियोजन करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व आत्ताचे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जलसंपदा विभागाचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला. आदरणीय शरद पवार साहेबांच्या धोरणांचा अवलंब करीत अजितदादांनी नेहमी शेतकरी हिताचाच विचार केला. अजितदादा जलसंपदा मंत्री बनले आणि जलसंपदा खात्याची जबाबदारी हाती घेताच सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. शेती, पाणी व औद्योगिक वापरासाठी अधिकाधिक सिंचन प्रकल्प राबवणे आवश्यक आहे हे दादांनी जाणले होते. जलसिंचन प्रकल्पांच्या तसेच सिमेंट काँक्रिट नाला बंधाऱ्यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. ठिबक सिंचन योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी-अर्जदारांना अनुदानाची रक्कम तातडीने वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अजितदादांनी आपल्या जलसंपदा मंत्री असतानाच्या कार्यकाळात घेतला. त्या दृष्टिकोनातून त्यावेळी अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली.

अजितदादांनी जलसंपदा मंत्री या पदाची धुरा सांभाळताना, कार्यभार पाहताना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत बारकाईने व गांभीर्याने अभ्यास केला. यातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्यात पावसाची अनियमितता यांसारखे अनेक प्रश्न समोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर तोडगा म्हणून धरण बांधकामाची सुरुवात, केनॉल, कालवे इत्यादी कामे प्राधान्याने पूर्णत्वास नेली. याशिवाय पाणी साठवण योजना यासारख्या योजना राबवल्या. यामुळे पाण्याची अडचण दूर झाली.

मराठवाडा विदर्भासहित उर्वरित महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी अजितदादांनी उपलब्ध करून दिला. गोदावरी, मांजरा नदीवरील बॅरेजेस, लघु पाटबंधारे याबरोबरच अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. एवढेच नव्हे तर जलसंपदा प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधीचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यामुळे रखडलेले वनजमीन, पुनर्वसन, भूसंपादनाचे प्रश्न तडीस लागले.

जलसंपदा मंत्री या नात्याने अजितदादांनी लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचे काम केले. त्यांचे जलसंपदा विभागातील काम संस्मरणीय आहे. महाराष्ट्रातील सर्व पाटबंधारे योजनांना गती देताना ठिबक आणि अनेक नव्या तंत्रज्ञानाचे बीज प्रक्रियांचे निर्णय त्यांनी घेतले. खोरेनिहाय धरण, पाटबंधारे, पाणलोट यासंदर्भात सर्वांगीण विचार करताना दादांनी धडक कामे मार्गी लावली. परिणामी अजितदादांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राबवलेल्या योजनांमुळे २००७-०८ ते २०११-१२ या पाच वर्षांच्या कालावधीत राज्याच्या सिंचन क्षेत्रात ५.९२ म्हणजे जवळपास ६ लाख हेक्टरने वाढ झाली. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढवण्याचा कृतिशील ठोस प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे कृषी उत्पन्न वाढीला आणि कृषी प्रगतीला मोठी चालना मिळाली. अशा पद्धतीने अजितदादा पवार यांनी पाण्याची अडचण असणाऱ्या जागोजागी जलस्रोत निर्माण केले.

इतिहास अजितपर्वाचा…
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर पडून आपलं पॅनल निवडून आणण्याची किमया ज्या व्यक्तीने करून दाखवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सद्यस्थितीला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे श्री. अजितदादा पवार साहेब. अजितदादांनी १९८३ ते ८४ यादरम्यान झालेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली होती. बारामती व इंदापूरच्या सीमेवर असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते १९८४ मध्ये निवडून गेले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचा आणि नंतर बँकेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार पाहताना बँकिंग क्षेत्रात त्यांनी कामातील आपल्या अनोख्या शैलीचा अमीट ठसा उमटवला.

कालानुरूप तो दिवस उजाडला जेव्हा अजितदादा पवार यांनी १९९१ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि विधिमंडळ कामकाजातील अधिकृत सदस्य ते बनले. त्यानंतर दादांनी आपल्या विजयाची पताका आजतागायत फडकवत ठेवली आहे. अनेकदा कॅबिनेट मंत्री पद त्यांनी भूषवले. पाणीपुरवठा, स्वच्छता व पाटबंधारे मंत्री पदाची धुरा सांभाळताना ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अशा सर्व विभागांमध्ये त्यांनी आदर्शवत कामं केली.

विशेष बाब अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून आणि ती जिंकून अजितदादा अवघे २७ वर्षांचे असताना खासदार बनले. अशा पद्धतीने आमदार, खासदार आणि मंत्री अशी राजकीय कारकीर्द अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवली. मुंबईत विधानसभेचे गटनेते म्हणून समर्थपणे त्यांनी जबाबदारी सांभाळली.

मागील ३० ते ३५ वर्षांत राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणारे अजितदादा २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. त्याबरोबरच वित्त विभागाची पुन्हा जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. त्यापुढील अडीच वर्ष अजितदादांनी चालवलेला राज्याचा कारभार आणि आर्थिक गाडा हा प्रशंसनीय चर्चेचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मिळालेले अर्थमंत्री पद सांभाळताना त्यांनी राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला. जेणेकरून देशाचे भविष्य असणारी युवा पिढी व्यसनातून बाहेर पडावी. अजितदादांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनाला गती दिली.

सध्याच्या घडीला अजितदादा पवार महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत जबाबदारी कोणतीही अंगावर येवो, त्या जबाबदारीला दादा योग्य न्याय देत आले आहेत आणि यापुढेही देतील यात काही दुमत असायचं कारण नाही. सत्तेत असो वा विरोधी बाकावर त्यांनी पुढे हाकलेली विकासाची कामं कधी थांबलेली नाहीत. विकासाभिमुख लोकनेता अशी अजितदादांची ओळख आहे आणि ती निरंतर राहील.

अजित दादा लवकरच मुख्यमंत्री होतील..!
महाराष्ट्रात असे असंख्य कार्यकर्ते आणि दादा समर्थक आहे ज्यांना अजित दादा पवार यांना एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान पाहायचे आहे. आजवर दादांनी ४ वेळा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. पण त्यांचे काम मुख्यमंत्री पदापुढे झाकोळून गेले नाही. ते कायम दखलपात्र राहिले. त्यांनी दिलेला शब्द ते कधीही विसरले नाहीत. ज्या धडाडीने त्यांनी काम केले तो वेग विलक्षण होता. यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात दादांविषयी आशा पल्लवित झाल्या, कि हा जो व्यक्ती आहे तो काहीतरी करू शकतो, तोच बदल घडवू शकतो. दादा मुद्द्यावर बोलतात, वायफळ बडबल करत नाही. जनतेचे मुख्य प्रश्न हाताळतात. जोवर त्यांना कुणी वैयक्तिक पातळीवर डिवचत नाही तोवर तेही कुणाला काही बोलत नाही. सोमवार ते शुक्रवार विधिमंडळ तसेच महाराष्ट्रभर दौरे आणि शनिवार व रविवार आपल्या लाडक्या बारामतीची कामे. दादांचा दिनक्रम ठरलेला असतो. तो कधीच चुकत नाही.

जनतेसाठी अविश्रांत काम करणारे दादाच जनतेला आवडतात. आजवर दादांनी कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास अश्या अनेक विभागांची कामगिरी लीलया पार पाडून आपला ठसा उमटवला आहे. आमदार, खासदार, मंत्री अश्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना शासकीय अधिकारी, सहकारी, गांवकरी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना आपल्या यशाचे श्रेय कायम दादा देत असतात.

उपमुख्यमंत्री पदावर असताना दादांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० % जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, युवापिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी केली, शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला, मागासवर्गिय आणि अल्पसंख्यांक महामंडळांच्या निधीत भरघोस वाढ केली, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषिपंप सवलतीच्या पदरात उपलब्ध करून दिले, जेजुरी, रत्नागिरी, कौडिण्यपूर, आदी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे शेकडो निर्णय दादांनी घेऊन महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.

आता फक्त मुख्यमंत्री पदावर दादा बसलेले पाहायचे आहे. कारण त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि जनतेविषयी असलेली कणव या सारासार न्याय ते नक्की देऊ शकतील. संबंध महाराष्ट्राला मा. श्री. मुख्यमंत्री अजित अनंत पवार हे ठळक अक्षरात पाहायला नक्की आवडेल.

खंबीर विरोधी नेतृत्व – अजित दादा पवार
गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन पार पडले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधारी उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हते. महाराष्ट्रापुढे अनेक महत्वाचे प्रश्न असताना सत्ताधारी मात्र त्या प्रश्नांना बगल देऊन विरोधकांना भलत्याच शाब्दिक तावडीत धरून अधिवेशनाचा वेळ वाया घालवीत होते. तरीही अजित दादांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. एकीकडे नागपूर NIT च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू असताना, विधान भवनाबाहेर भाजपाचेही सुषमा अंधारेंविरोधात आंदोलन सुरू होते.

भाजप आणि शिंदे गटाचा नक्की काय प्रॉब्लम आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळत नाहीये. भाजप सत्तेत नव्हती तेव्हाही आरडाओरडा करत होती, आता सत्तेत आहे तरीही आंदोलन करत आहेत. फडणवीसांना किती दिवस मोदींचा सहारा घेऊन सत्तेतही फळं खाता येणार आहे कुणास ठाऊक? कारण त्यांचा एकही आमदार त्यांच्या नियंत्रणात  नाही असच दिसून येत आहे.

अजित दादा विरोधी पक्ष नेते या नात्याने मात्र या अधिवेशनात १००% खरे उतरले आहेत. एका नामांकित न्यूज पोर्टलने घेतलेल्या पोलमध्ये ‘हिवाळी अधिवेशन कोणत्या नेत्याने गाजवले या प्रश्नाचे उत्तर देताना महाराष्ट्रातील जनतेने अजित दादांना पहिली पसंती दिली आहे. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण असो, वा जयंत पाटील साहेबांना पाठींबा देणे, मित्रपक्षांची बाजू मांडणे असो वा महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरणे, अजित दादांनी चोहीकडून बॅटिंग करून सरकारला जेरीस आणले हे सत्य कुणीही नाकारणार नाही.

यंदाच्या अधिवेशनात महापुरुषांचा वारंवार होणारा अपमानही महत्वाचा आणि गंभीर मुद्दा होता. केवळ विरोधासाठी विरोध ही महाविकास आधाडीची भूमिका नाही हे अजित दादांनी स्पष्ट केले. महापुरुषांचा सातत्याने होणारा अपमान, सीमाप्रश्न हाताळण्यात आलेले अपयश व विदर्भाच्या अनुशेषाबाबतची उदासीनता या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दादांचा वाढता दबाव पाहून हबकलेल्या सत्ताधाऱ्यांना मात्र घाम फुटला. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी धर्मवीर कि स्वराज्यरक्षक हा बाष्कळ मुद्दा उचलून धरला. भाजप आणि शिंदे गट बाष्कळ मुद्द्यावर तासोनतास गदारोळ करून कश्याप्रकारे सभागृहाचा वेळ वाया घालवीत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. अजित दादांनी मात्र त्यांची कुटील खेळी उधळून लावली. सभागृह भरकटत असताना आणि अध्यक्षांच्या पक्षपातीपणामुळे अजित दादांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सभात्याग करून सरकारला वेठीस धरले.