दादा मुख्यमंत्री व्हावे ही तर जनतेची इच्छा..!

किती काहीही झालं तरी शरद पवार आणि अजित पवार समजणे हे विरोधकांना शक्य नाही. गेल्या आठवड्यात दादा २ तास गायब होते तर महाराष्ट्रात काहूर उठला होता. माध्यमांनी दिवसभर ती न्यूज चघळली. नको नको त्या तर्क-वितर्कांना उधाण आले. आता काय होईल या विचाराने जनता आणि सत्ताधारी यांची झोप उडाली होती. पण शेवटी दादांनीच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी सोडून आपण कधीही कुठे जाणार नाहीत हे त्यांनी आपल्या जरबेच्या आवाजात ठणकावून सांगितले.

खरं पाहावे तर अजित दादा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक, नेता आणि माध्यम प्रतिनिधींची आहे. दादांच्या काम करण्याची पद्धत सर्वश्रुत असताना सर्वांची अशी ईच्छा असणे हे गैर नाही. निर्णय घेण्याची आणि काम तडीस नेण्याची अनोखी शैली त्यांच्याकडे आहे. असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा अशी जनतेची इच्छा आहे. खुद्द दादांनी देखील हि इच्छा बोलून दाखवली. मुख्यमंत्री हे पद जितक्या प्रतिष्ठेचे असते तितकेच ते पद जबाबदारीचे देखील असते. अजित पवार हे नावच मुळात मुख्यमंत्री पदाला साजेसं असं आहे. कारण या नावाभोवती महाराष्ट्राच राजकरण कसं फिरत हे सार्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात पाहिलंय. महाराष्ट्राच संपूर्ण एकहाती नेतृत्व नजीकच्या काळात अजितदादा करतील याबद्दल कोणाच्याही मनात किंचितशी शंका नाही.  

बारामती आणि अजित पवार हे एक दैवी समीकरण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण बारामतीकरांचा पवार कुटुंबावर आणि विशेष करून अजित दादांवर किती जीव आहे हे आपल्याला निवडणुकीच्या मताधिक्यातून दिसून येतेच. गेले ३ दशके दादा महाराष्ट्र विधानसभेवर सदस्य म्हणून निवडणून येत आहेत. महाराष्ट्रात हे सौभाग्य बोटावर मोजता येईल इतक्या नेत्यांना लाभले आहे. अजितदादा त्यापैकीच एक नाव.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती दिसत असली तरी स्थिर नाही. वरच्या पातळीवर प्रचंड उलथापालथ चालू आहे. त्यात अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होतील असे वारे सध्या महाराष्ट्रात वाहू लागले आहे.