न्यूज चॅनेलच्या ओघवत्या बुलेटिनमध्ये अँकरच्या तोंडून अजित पवार हे नाव जरी आलं तरी दर्शक कान टवकारतात. कारण अजित दादांच्या राजकारणाचा मोठा भाग हा लोकांच्या आयुष्याशी निगडित असतो. तिथे इतर नेत्यांसारखा गरळ ओकण्याचा विषय नसतो. दादा नेहमीच महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस एक करीत असतात. सत्ता असो वा नसो दादा अविरत काम करीत असतात हे महाराष्ट्राला माहीतच आहे.
दादा आणि बळीराजा यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजाला प्रचंड कष्ट सोसावे लागतात. बळीराजाची ही अवस्था पाहून दादा दुष्काळातील जनतेला दिलासा देण्यासाठी उन्हातान्हात फिरतात. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकरी, पिण्याच्या पाण्यासाठी दही दिशा फिरणाऱ्या माता-भगिनी, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे चिंतेत असणारे छोटे कारखानदार याना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून निश्चितच काहीसा आश्चर्यकारक दिलासा देणारा निर्णय दादा तळमळीतून घेतात. त्यासाठी राज्याची तिजोरी मुक्तहस्ताने दुष्काळी जनतेच्या यातनांचा निर्मूलनासाठी खाली करतात.
महिला शिकून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती कुटुंबाला उभे करते. त्यामुळे महिला सबलीकरण हा विषय अजितदादांच्या अजेंड्यावर आधीपासूनच आहे. महिलासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ५०% राखीव जागांचा निर्णय दादांच्या पुढाकाराने झाला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय होता.
बळीराजा, महिला, युवक, दलित, आदिवासी यांचा विकास हा दादांच्या राजकारणाचा गाभा. दादांनी या उपेक्षित वर्गासाठी घेतलेले निर्णय हे त्यांना या वर्गाचा तारणहार म्हणून सिद्ध करतात. दादा स्वतः शेतकरीपुत्र असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजते. शेतकरी वर्गाला किती संकटांचा सामना करावा लागतो याची जाणीव दादांना आहे.
दादा सत्तेत असो वा विरोधी पक्षात, त्यांच्या नावाची हवा कायम जनमाणसांमध्ये होत असते. दादा सडेतोड आणि मोजकं बोलतात. मध्यंतरी पवार साहेबांच्या ८२व्य वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दादांनी राष्ट्रवादी पक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील थेट संबंध नजरेस आणून दिला आणि ते ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी पक्षातील सर्वाना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन देखील केले.