कार्यकर्त्यांचे प्रिय दादा

तसं पाहायला गेलं तर अजित दादा पवार आणि कार्यकर्ते हे समीकरण महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. एखादा कार्यकर्ता दादांशी जोडला गेला तर मग जीव गेला तर बेहत्तर पण दादांसाठी वाटेल ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांची असते. वेळप्रसंगी दंडदेखील ज्येष्ठ या नात्याने कार्यकत्यांशी वडील नात्याने संवाद साधतात, त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांची कामे करतात. बदल्यात दादांना मिळते कार्यकत्यांचे अफाट प्रेम.

नुकतीच पुण्यात जिल्हा आढावा बैठक पार पडली. जिल्हा स्तरावर लोकांचे प्रश्न सोडवले जात आहेत का? ह्याचा दादांनी आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी संवाद घालत असताना लोकांची कामे न केल्यास कानाखाली देईन आणि पद काढून घेईन असे दादा म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यावर अनेकांकडून प्रतिक्रया आल्या. पण तिकडे उपस्थित कार्यकर्त्यांना मात्र दादांच्या या वक्तव्याचे काही वाटले नाही. कारण दादा याआधी देखील कार्यकर्त्यांशी कठोर भाषेत बोलले आहे. कार्यकर्त्यांची कानउघाडणी करण्याचा दादांचा उद्देश काही चुकीचा नसतो. लोकांची काम व्हावी, पक्ष पुढे जावा हेच दादांना वाटते.

झाले असे कि, पुण्यातील २ कार्यकर्त्यांचा पदावरून वाद झाला. हे दादांना कळले. यावेळी दादांनी त्यांना चांगलाच दम दिला. मुळात पदावरून कार्यकर्त्यांनी भांडू नये. ज्याला जी जबाबदारी दिली आहे ती त्याने लीलया पार पाडावी असा दादांचा उद्देश असतो. लोकांची काम वेगानी झाली पाहिजे, प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे, यासाठी दादांची धडपड असते. दादा अहोरात्र काम करून जनतेच्या प्रश्नांना महत्व देतात आणि तिथे कार्यकर्त्यांनी पदावरून भांडणे दादांना काही पटले नाही. म्हणनूच त्यांनी थोडा कठोर पवित्रा घेऊन कार्यकर्त्यांना तंबी दिली. पण असं बोलण्याची दादांची हि पहिली वेळ नाही. जिथे जिथे गरज पडते तिथे तिथे दादा असा कठोर पवित्रा घेतात. अंततः दादांचे चिडणे हे लोकांची विधायक कामे पूर्ण होण्यासाठीची तळमळ असते हे कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक असते.