ग्रामपंचायत निवडणुकीत अजित दादा पवार गटाने मोठे यश

ग्रामपंचायत निवडणुकीत अजित दादा पवार गटाने मोठे यश मिळवल्याने राज्यातील जास्तीतजास्त महानगर पालिका आणि जिल्हा परिषदा जिंकण्याची शक्यता
———————

ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. येत्या काळात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी या निवडणुका म्हणजे पूर्वतयारी आहे असे समजले जाते. अशा निवडणुकांमधून विविध राजकीय पक्षांची ताकद किती आहे हे लक्षात येते. कोणत्या तालुक्यातील, कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाकडे आहेत यावरून पुढच्या निकालाची दिशा ही कळत असते. त्या अनुषंगाने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आलेले आहे.

सध्या राज्यातील अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक आहेत. बऱ्याच दिवसापासून निवडणुका विविध कारणांनी प्रलंबित आहेत परंतु आता भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका लवकरच होतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे.जर या निवडणुका लवकरच झाल्या तर अजित दादा पवार गट जास्तीत जास्त महानगर पालिका आणि जिल्हा परिषदा जिंकू शकतो.

राज्यात 15 पेक्षा अधिक महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचां उत्साह अधिक वाढल्याने लवकरच या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज दिसून येतो.

आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकून घवघवीत यश मिळवलेले आहे. त्यानंतर अजित पवार गटाने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारून मोठे यश संपादन केले आहे.शिंदे गटाने बाजी मारली आहे.

निवडणूक घ्या… म्हणून सारखे विविध मेळाव्यातून, भाषणातून, पत्रकार परिषदेतून सांगणारे श्री. उद्धव ठाकरे यांची या निवडणुकीत मोठी हार झालेली दिसून येते. त्यांचा पक्ष सर्वात पिछाडीवर गेलेला दिसून येतो.तर शरद पवार गटालाही फार यश मिळाले नाही.त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी ठाकरे गटाला त्यांच्या प्रमाणे टोमणे मारणे सुरू केलेले आहे.

ग्रामीण भागात अजित दादा पवार गटाचे चांगले नेटवर्क आहे.अनेक जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत .त्यांच्या सोबत असलेल्या अनेक आमदारांची भाजपा पेक्षा ग्रामीण भागातील राजकारणावर पकड आहे.सर्व जण सहकारी संस्थांशी जोडले गेल्याने मतदारांशी नाळ जुळलेली आहे.स्वतः अजित दादा यांचा ग्रामीण भागाशी दांडगा जनसंपर्क असल्याने ते यश खेचून आणू शकतात.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा पवार गट यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने त्यांची आघाडी भविष्यात भक्कमपणे उभी आहे.त्यामुळे महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जर झाल्या तर अजित दादा पवार गट राज्यात क्रमांक एक वर राहील यात शंका नाही.

Share via
Copy link