नाद करा पण, दादांचा कुठं ?

अलीकडे स्वतःला मोठं व्हायचं असेल तर कुठल्या तरी मोठ्या व्यक्तींवर टीका टिप्पणी करून लोकं प्रसिद्धी मिळवतात. यापैकीच एक नाव म्हणजे शहाजी बापू पाटील. हल्ली उठसूट उठतात आणि अजित दादांवर टीका करतात. ‘काय झाडी काय डोंगर’ च्या प्रसिद्धी नंतर त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आलेला दिसतोय. त्या आधी यांचं नाव सांगोला तालुक्याबाहेर कुणाला माहित देखील नव्हते. पण त्यांचं उठसूट अजित दादांवर टीका करणं हे जरा अजबच आहे.

राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार असताना ‘राष्ट्रवादीने निधी पळवला’ असा बिनबुडाचा आरोप केला होता. पण त्याच्याच फेसबुक अकाउंटवर त्यांनी मिळालेल्या निधीतून विकास कामे केल्याचा पुरावा मिळतोय. चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटोदेखील त्यांच्या बॅनरवर पाहायला मिळतायेत. मग का बरं बापू पाटील उठसूट अजित दादांवर निशाणा साधत आहेत? त्याच कारण आहे दादांभोवती असलेलं वलय. एकदा प्रसिद्धी मिळाली कि त्या प्रसिद्धीची गंमत काय असते ह्याची चव बापू पाटलांनी गद्दारी करून झाडी डोंगरच्या डायलॉगने चाखलेली आहे. आता याच प्रसिद्धीची त्यांना चटक लागली आहे. महाराष्ट्रात कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलल्यावर आपल्याला प्रसिद्धी मिळेल हे त्यांना ठाऊक आहे. पण बापू पाटील यांना अजित दादांचा हिसका अजून माहित नाही. त्यांना कोणीतरी विजय शिवतारेंना फोन लावून देण्याची गरज आहे. शिवतरेच त्यांना सांगतील कि बाबा रे कशाला उगाच नाद करतोय दादांचा?

गोष्ट २०१९ च्या खासदारकीच्या निवडणुकिची आहे. पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. विजय शिवतारेंनी त्यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. पार्थदादा दुर्दैवाने पडले. पण अजित दादांनी मात्र राष्ट्रवादीवर सतत वार करणाऱ्या विजय तारेना चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवले आणि ‘आमदार होऊन दाखवण्याचे…’ खुले आव्हान शिवतारेंना दिले. दादांनी एकदा शब्द दिला कि दिला. विजय शिवतारेसारख्या मातब्बर आमदाराला त्यांनी निवडणुकीत पराभव दाखवला. विजय शिवतारे आजही दादांच्या नादाला लागल्याचा पश्चाताप करतात. बरं तसं शहाजी पाटील आणि विजय शिवतारे यांची तुलना करायची म्हटलं तर विजय शिवतारे हे मोठे नेते. त्यामानाने शहाजी बापू पाटील यांना कधी मंत्री पद भूषवत आले नाही. तरी फक्त आणि फक्त ‘झाडी डोंगर’ च्या प्रसिद्धीच्या जोरावर शहाजी पाटील यांनी अजित दादांशी पंगा घेणे हे काही बरं नाही.

आज संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, दादा एखादे काम जेव्हा हाती घेतात तेव्हा संपूर्ण करूनच शांत बसतात. त्यांच्या काम करण्याची अनोखी शैली हि कायम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेली असते. शहाजी पाटील २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ६७४ मतांनी निवडून आले होते, अश्या आमदाराने ज्याला जनाधारच तुटपुंजा आहे त्याने विरोधकांचे डिपॉजिट जप्त करायला लावणाऱ्या नेत्यावर तोंडसुख घेणे म्हणजे अतीच आहे.

त्यामुळे शहाजी पाटील जरा सांभाळून. आगीत हात घातला तर चटका बसणारच. आधीच गद्दारी करून तुम्ही तुमची राजकीय कारकीर्द धोक्यात घातली आहेच. . आता अश्या नाजूकी वेळी जर दादांसारख्या नेत्याच्या नाती लागाल तर पुढे ग्रामपंचायतीलादेखील निवडून येणे मुश्किल होईल. काँग्रेस, शिवसेना आणि गद्दारसेनेची वारी केल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.