विकासपुरुष भाग १

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक योजनांना यशस्वीरीत्या राबवले आहे. शिक्षण, उद्योग, शेती, वीज, पाणी आदींशी संबंधित योजनांच्या बाबतीत दूरदृष्टी दाखवून दादांनी महाराष्ट्रात विकास साधला आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी दादांनी केली आहे. ग्रामीण पट्टा असो, शहरी पट्टा असो.. तिथल्या मुला-मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम अजितदादांनी केलं आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक घटकाला आहे. त्यानुसार सर्वांना शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी समाजातील सर्व स्तरांतील मुला-मुलींसाठी शिक्षणासाठीची भरीव तरतूद विकासपुरुष अजितदादा पवार यांनी केली आहे. विविध क्षेत्रात विकास घडवून आणणाऱ्या दादांना मात्र आपल्या कामगिरीची दवंडी पिटवायला आवडत नाही. काम असं करा जे लोकहिताचं असेल; केवळ प्रसिद्धीसाठी नको, अशा विचारांचे दादा एक कार्यशील नेतृत्व आहे, यात वादच नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार आदरणीय शरद पवार साहेबांनी १९७२ साली विद्या प्रतिष्ठान ट्रस्टची स्थापना केली. ह्या ट्रस्टचा पाया भक्कम करण्यासाठी पवार साहेबांनी जे कष्ट घेतले त्याच कष्टांचं चीज करण्यासाठी अजितदादा पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या कारभारात स्वतःला वाहून घेत संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. सुरुवातीच्या काळात विद्या प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पहिलं. त्यानंतर ट्रस्टी म्हणून दादांनी कामाची जबाबदारी सांभाळली. या संस्थेच्या माध्यमातून केवळ बारामतीचे नव्हे तर राज्यभरातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली. आजच्या घडीला संस्थेचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवण्यात  अजितदादांचं योगदान मोलाचं राहिलं आहे.

बारामती आणि मुंबईत अजितदादांचा जनता दरबार भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं लोक जनता दरबारच्या माध्यमातून आपल्या अडी-अडचणी, समस्या, व्यथा दादांसमोर मांडतात. सरकारी, आर्थिक, शैक्षणिक यांसारख्या विषयांशी संबंधित अडचणींना घेऊन लोक दादांकडे आपली गाऱ्हाणी मांडतात. विशेष म्हणजे यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असल्यास अजितदादा आवर्जून लक्ष देत आले आहेत.

शाळा संस्था, विद्यापीठ वा शिक्षणाशी निगडित अन्य बाबींवर उद्भवलेली समस्या सोडवण्यावर दादा भर देताना आपल्याला दिसतात. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजच्या घडीला असंख्य मुलांचं शैक्षणिक आयुष्य सुखद बनलं आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी शिक्षण पूर्ण करून आपलं करिअर घडवलं आहे. याचं संपूर्ण श्रेय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना जातं. भविष्याला आकार देणारी भावी पिढी घडली तर राज्य घडेल, देश घडेल या विचारांचे दादा आहेत. अजितदादांकडे येणारा कोणताही विद्यार्थी रिकाम्या हाती मागे फिरत नाही. आर्थिक वा सरकारी कोणत्याही कारणामुळे थांबलेलं शिक्षण पुन्हा सुरळीत चालू होणार, हा विश्वास सोबत घेऊन तो विद्यार्थी बाहेर पडतो.

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या विकासाचा चाक आहे, असं दादा सांगतात. राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी पिढी घडवणारा विकासपुरुष म्हणजे अजितदादा पवार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भावी विकासाला वाट मोकळी करून देण्याचा अतिशय महत्त्वाचं काम अजितदादा करत आहेत.