अजित दादा – एक परिपूर्ण राजकारणी (भाग-१)

आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला दिसतंय कि राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस किती खालावत चालला आहे. मागील काही महिन्यात घडलेल्या अनागोंदीमुळे जनता पुरती पेचात पडली आहे. कोणीही नेता उठतो कोणावरही ताशेरे ओढतो, वाटेल ते बोलतो, आरोप करतो, ED-CBI च्या धमक्या देतो. काल परवा पैशाच्या बळावर राजकरणात आलेली माणसे गेले अनेक दशके राजकारणात कार्यरत राहून लोकांची कामे करणाऱ्या नेत्यांवर बेछूट आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज नावाच्या भाजपच्या नेत्याने अजित दादा पवार यांच्यावरही असेच आरोप केले. पण या नेत्याला काहीही करता आले नाही. कारण करण्यासारखे असे काहीही नाही. अजित दादांचे राजकारण पाण्यासारखे नितळ आहे. कंबोज सारख्या तीनपाट नेत्यांची त्यांच्या सावलीला देखील बसायची पात्रता नाही. इतकं अफाट राजकीय नेतृत्व असलेला हा नेता आहे 

अजित दादा कायम त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, शिस्तबद्धत, काटेकोरपणा यांमुळे चर्चेत असतात. किंबहुना साऱ्या महाराष्ट्रात तशी त्यांची ख्यातीच आहे. अबालवृद्धांपर्यंत अजित दादांची क्रेज दिसते ती अशीच नाही. हे कमवायला त्यांना जवळपासदशके गेली. कार्यकर्तेतर दादांवर जीव ओवाळून टाकतात. बारामती असो वा मुंबई दादांच्या भोवती कायम कार्यकर्त्यांची जंगी गर्दी असते. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते त्यांच्याशी सुसंवाद साधतात. एखाद्या व्यक्ती वेगळीच धमक असेल तर ते अश्या व्यक्तीला त्यांच्या योग्य ठिकाणी नेऊनही ठेवतात. कार्यकर्ता घडतो तो दादांसख्याच नेत्यामुळे. दादा अजिबात कोणाला खोटी आश्वासने देत नाही. एखादे काम होत असेल तर ते काम करण्यास बिलकुल धजावत नाहीत, पण एखादे काम होणार नसेल तर ते नाहीच म्हणून सांगतात. उगाच कोणाला खोट्या अपेक्षांवर झुलवत ते ठेवत नाही.      

  

जे दादांना आणि दादांच्या कार्यशैलीला ओळखतात त्यांना दादा मुख्यमंत्री व्हावे अशी मनापासून इच्छा आहे. दादा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल होतील हे जनतेला ठाऊक आहे. विरोधकही दादांशी बोलताना थोडे कचरून असतात. विधानसभेमंध्ये जर कोणा सदस्यांकडून सभागृहाची मानमर्यादा पाळली गेली नाही तर दादा तात्काळ अश्या सदस्याला समाज देतात. एकदंरीत दादांचे व्यक्तिमत्व हे कठोर, शिस्तप्रिय कायद्याने चालणाऱ्या नेत्याचं व्यक्तिमत्व आहे. अश्या नेत्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधक तर साहजिकच करणार यात काही विशेष नाही.