जे आत तेच बाहेर… असे अजितदादा.. 

राजकारण म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतात आणिनको रे बाबाअसले शब्द आपसूक लोकांच्या तोंडून बाहेर पडतात. पण राजकारणात राहून अनेकजण समाजपयोगी कामं करणारी मंडळी सुद्धा आहेत ज्यांच्यामुळे राजकारणाची बाजू देखील सकारात्मक वाटते.महाराष्ट्रातल्या राजकारणाला स्वतःची एक वेगळी ओळख असून देशाचं लक्ष सुद्धा इथल्या राजकीय हालचालींकडे असतं. राजकीय पातळीवर महाराष्ट्राची सकारात्मक छबी निर्माण करण्यामागे, चर्चा होण्यामागे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आदरणीय शरद पवार साहेब यांसारख्या अनेक महान नेत्यांचा सहभाग आहे. यात आणखी एक नाव आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. अजितदादा पवार. पारदर्शक कामकाजात स्पष्टोक्तेपणा हा दादांच्या कार्यशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. 

 गेली तीन दशकं राजकारणात सक्रिय असणारे अजितदादा आपल्या वक्तशीरपणासाठी देखील प्रसिद्ध आहेत. स्वभाव असो वा प्रशासकीय कामकाजजे आत तेच बाहेरअशी दादांची ख्याती आहे. आपली कामं, अडचणी घेऊन येणारा प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा खात्रीने दादांची भेट घेतो की आपलं काम होणारच. कारण अजितदादा म्हटलं तरनाहीया शब्दाला जागा नाही. काम होण्याची शक्यता एक टक्का जरी असली तरी समोरच्या व्यक्तीला ते निराश करत नाहीत. जे सत्य आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होणारे सर्वांचे लाडके दादा हे अवघ्या महाराष्ट्राची शान आहेत. ‘बोले तैसा चालेयाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द घडत आली आहे. आजच्या घडीला दादांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची सभा म्हटल्यावर उसळणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे.  

राजकारणात राहून समाजकारण करणं, दोघांमधला समतोल राखणं सोपं नव्हे. परंतु अजितदादांनी अगदी सहजपणे यांमधील ताळमेळ जुळवून आणला आहे. सत्तेत असलो तर जनसामान्यांची कामं फास्ट ट्रॅक वर कशी पूर्ण होतील, यावर भर देणार. विरोधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांकडे सततचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कामं मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे, दादांनी दिलेला शब्द खाली पडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी प्रशासनाकडूनही घेतली जाते. 

आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांवर आणि धोरणांवर चालणारे अजितदादा हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत, यात शंका नाही. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला आणि आता स्वतः सुद्धा मार्गदर्शक बनून युवा पिढीला दिशा दाखवण्याचं काम ते करत आहेत. 

 कोणतेही प्रकल्प, काम पूर्णत्वास नेण्यासाठी पारदर्शकता, व्यापक दृष्टिकोन आणि अचूक निर्णय या तीन गोष्टी अधिक उपयुक्त ठरतात. पवार साहेबांचे हे गुण अजितदादांनी अंगिकारले असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा तीन दशकांपासून कायम राहिला आहे. ‘जे आत तेच बाहेरयाप्रमाणे त्यांनी कधीच लपवाछपवीचं राजकारण केलं नाही. जे आहे ते समोर, अगदी रोखठोक. राजकीय कारकीर्द घडवताना अजितदादांवर पवार साहेबांचे झालेले संस्कार आणि त्याची दुरवर पसरलेली मुळं या साऱ्याला विशेष महत्त्व आहे. पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत दादांनी राजकारणात मोठा पल्ला गाठला आहे, जो सहज कुणाला गाठणं शक्य नाही. दर्जेदार आणि पारदर्शक कारभार हीच दादांची खासियत आहे. जे आत तेच बाहेरअसे अजितदादा..